Advertisement Advertisement

नालीच्या वादातून तुफान हाणामारी! कुऱ्हाडीने दाम्पत्यावर हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे नालीच्या क्षुल्लक वादातून एका दाम्पत्यावर कुऱ्हाड, लोखंडी गज, काठी व दगडाने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना ९ जुलै रोजी सकाळी घडली. या प्रकरणी १२ जुलै रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे व शेजारी राहणारे रमेश विक्रम लोखंडे यांच्यात नालीच्या कारणावरून नेहमी वाद होत होते. ९ जुलै रोजी सकाळी सुमारे ६ वाजता फिर्यादींची पत्नी घराबाहेर असताना पूजा रमेश लोखंडे यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

पत्नीला सोडवण्यासाठी रमेश सोनोने गेले असता रमेश विक्रम लोखंडे याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुनील विक्रम लोखंडे याने काठीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. पूजा लोखंडे हिने फिर्यादीच्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज मारला, तर कमल लोखंडे यांनी दगडाने हल्ला केला. निखिता लोखंडे हिने केस ओढून मारहाण केली, स्वाती लोखंडे हिने चापटाबुक्यांनी मारहाण केली, तर कुंदन रमेश लोखंडे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी अमोल खराडे आणि प्रमोद सालोक करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!