Advertisement Advertisement

अंढेरा पोलिसांचे उल्लेखनीय यश; ११ पैकी १० बेपत्ता महिलांचा शोध….

अंढेरा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विविध कारणांनी बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यात अंढेरा पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. यंदाच्या १ जानेवारी ते ५ जून २०२६ या कालावधीत नोंद झालेल्या ११ बेपत्ता महिलांपैकी तब्बल १० महिलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एका महिलेचा शोध अद्याप सुरू असून पोलीस यंत्रणा त्यासाठी प्रयत्नशील आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निर्देशानुसार या प्रकरणांचा गांभीर्याने तपास करण्यात आला. त्यासाठी विशेष शोध पथके तयार करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह मध्यप्रदेश राज्यातही शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक रुपेश शक्करगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, नातेवाईक व परिचितांची चौकशी तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शोधकार्य केले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १० महिलांचा ठावठिकाणा लागला.

शोधून काढलेल्या सर्व महिलांना सुरक्षितरित्या त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या कालावधीत अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन बालिकांचाही शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्यासह दिनेश घुगे, सिद्धार्थ सोनकांबळे, नितीन पुसे, पंढरी नेमाने, किशोर जाधव, ज्योत्स्ना गवई, मारुती कायंदे आणि भरत पोफळे यांनी शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!