Advertisement Advertisement

मेहकरमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; हॉटेल मालकासह दोघांना अटक…

मेहकर(बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील डोणगाव रोडवरील हॉटेल शिवराज वाइनबार व्हेज अँड नॉनव्हेज येथे सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर मेहकर पोलिसांनी बुधवारी, २७ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत हॉटेल मालकासह दोघांना अटक करण्यात आली असून पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणी विजय विष्णू लादे (वय ३६, रा. संतोषी मातानगर, मेहकर) आणि प्रमोद मुरलीधर धोंडगे (वय ४८, रा. चनखोरे कॉलनी, मेहकर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद धोंडगे याच्या मालकीच्या हॉटेल शिवराज वाइनबारमध्ये महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. छाप्यामध्ये आरोपी महिलांना पैशांचे प्रलोभन देऊन देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोनसह इतर साहित्य असा एकूण १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईदरम्यान पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही मेहकर बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेला अशाच प्रकारचा वेश्याव्यवसाय पोलिसांनी उध्वस्त केला होता. त्यामुळे शहरात पुन्हा अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांनी कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!