Advertisement Advertisement

पहिले घशात दुखायला लागले;असिडिटी समजून दुर्लक्ष महागात! नंतर कारण कळलं…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील लोणार येथे एका १९ वर्षीय तरुणीचा विषारी सापाच्या दंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र शेषराव सानप यांची मुलगी कुमारी साक्षी (वय १९) ही २ एप्रिलच्या रात्री आई-वडिलांसमवेत घरी झोपलेली असताना तिला विषारी सापाने दंश केला. सकाळी उठल्यानंतर तिच्या घशात वेदना होत असल्याचे तसेच अॅसिडिटीसारखा त्रास जाणवत असल्याने कुटुंबीयांनी तिला तात्काळ लोणार येथील रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित साप शेजाऱ्यांच्या अंगणात आढळून आल्याची माहिती आहे. साक्षी ही सुलतानपूर येथील बी. फार्मसी द्वितीय वर्षाची अभ्यासू व हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

साक्षीच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!