Advertisement Advertisement

बुलडाण्यात संतापजनक प्रकार! अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, वृद्ध व्यावसायिकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात एक संतापजनक घटना समोर आली असून एका व्यावसायिकाने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित आरोपी हा वयोवृद्ध असून ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीशी अशोभनीय वर्तन केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने विश्वासाचे नाते निर्माण करून मुलीचा गैरफायदा घेतला. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची गंभीर दखल घेत बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!