Advertisement Advertisement

आ. रोहित पवार आज बुलढाणा दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांना उपस्थिती, सायंकाळी पत्रकार परिषद….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे गुरुवार, ७ मे २०२६ रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक व पक्षीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात ते सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा आणि हरसोडा येथे भेटी देणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात सकाळी १०.३० वाजता सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता देऊळगाव राजा येथील बालाजी महाराज मंदिरात दर्शन घेतील.

दुपारी १२.४५ वाजता संत चोखा महाराज यांच्या जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर ते चिखली येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रामभाऊ खेडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व भोजनाचा कार्यक्रम होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर यांच्या शहर कार्यालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानीही ते सदिच्छा भेट देणार आहेत.

दुपारी ३ वाजता बुलढाणा येथे माजी मंत्री डॉ. शिंगणे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय आणि श्री शिवाजी विद्यालयाला भेट देण्यात येणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता बुलढाणा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

यानंतर सायंकाळी ५ वाजता ते बुलढाण्यावरून मलकापूर मार्गे हरसोडाकडे रवाना होणार असून, संतोषभाऊ रायपुरे यांच्या वतीने आयोजित भागवत सप्ताह कार्यक्रमास सायंकाळी ६ वाजता उपस्थित राहतील. दौरा पूर्ण करून रात्री ८.३० वाजता ते पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.

ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!