Advertisement Advertisement

घरातून विवाहितेचे अपहरण; अन् थेट शेतातील टिनशेडमध्ये कोंडून ठेवल्…! हिवरखेड पोलिसांत गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ३२ वर्षीय विवाहितेचे घरातून जबरदस्तीने अपहरण करून तिला शेतातील टिनशेडमध्ये डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी एका नामनिर्देशित आरोपीसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलैच्या मध्यरात्री संबंधित महिला आपल्या घरी झोपलेली होती. त्यावेळी घराच्या दरवाजावर थाप मारण्यात आली. दरवाजा उघडताच तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन व्यक्तींनी तिला जबरदस्तीने घराच्या मागील बाजूस नेले. त्यानंतर तिला शेतातील एका टिनशेडमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

या घटनेनंतर महिलेने १५ जुलै रोजी हिवरखेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एका नामनिर्देशित आरोपीसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी हिवरखेड पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!