Advertisement Advertisement

BREAKING:कर्जमुक्ती,पिक विम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र पेटला…!तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका! मुरादपूर फाटा येथील टोलनाका , मेहकरच्या तलाठी कार्यालय आणि पोखरी येथील चार चाकी गाडी जाळण्याचा प्रयत्न…!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले असून आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जाळपोळ, रास्ता रोको, तहसील कार्यालयांवर धडक, तसेच विविध शासकीय कार्यालयांसमोर आंदोलन करून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तुपकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यांमध्ये स्वयंस्फूर्त आंदोलन उभारण्यात आले आहेत.

मंगळवारी रात्री चिखली देऊळगाव राजा रोडवरील मुरादपूर फाटा येथे टोलनाका जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच इतर काही ठिकाणी तलाठी कार्यालया पेटवण्याचा प्रयत्न केला, तर बुलढाणा तालुक्यातील पोखरी येथे एका चार चाकी वाहनाला आग लावण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.तातडीने आग विझवण्यात आल्याने कुठलाही माहिती मिळाली असून अनुचित प्रकार घडला नाही तलाठी कार्यालायचे सुद्धा दरवाजाच जळाला असला तरी आंदोलनाचा भडका उडला ऐवढे मात्र निश्चित…

दरम्यान, आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांचा संताप कायम असून राज्यभरातून तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. विविध गावांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत असून प्रशासनावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालल्याची भावना आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!