Advertisement Advertisement

बुलढाण्यात गर्भलिंग निदानाच्या संशयावरून धडक कारवाई; डॉक्टर व मुलगा ताब्यात….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील सुंदरखेड परिसरातील तार कॉलनी येथे गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून, एका डॉक्टरसह त्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सुंदरखेड येथील अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ. गवई यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरून आरोग्य विभागाने डमी महिलेला सोनोग्राफीसाठी पाठवून सापळा रचल्याचे सांगण्यात आले.

कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची औषधे, इंजेक्शने, गोळ्या तसेच इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे डॉ. धनंजय चिमणकर यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!