Advertisement Advertisement

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला ना. प्रतापराव जाधव यांचा प्रतिसाद; ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनाचा समावेश…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या इंधन तुटवड्याच्या समस्येचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसाठी वाहनांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनाचा समावेश केला आहे.

ना. जाधव यांनी टाटा हरियर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करून त्याच वाहनातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क दौरे सुरू केले आहेत. एमएच २८ सीसी ३३६० क्रमांकाच्या या इलेक्ट्रिक वाहनाची तब्बल ५०० किलोमीटरपर्यंत रेंज असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाची तात्काळ अंमलबजावणी करत ना. प्रतापराव जाधव यांनी स्वतःसाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला असून, पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीचा संदेश त्यांनी कृतीतून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!