शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील इकबाल चौक परिसरातील आशिर्वाद गेस्ट हाऊसवर पोलिसांनी धाड टाकून अनैतिक देहव्यापार प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कायम अपराध क्रमांक 326/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8.10 वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या फिर्यादीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिर्वाद गेस्ट हाऊसमध्ये महिलांना व ग्राहकांना बोलावून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत काही आरोपी ग्राहक म्हणून आढळून आले.
या प्रकरणात हुसेन खान अजगर खान याच्यासह खामगाव व अमरावती जिल्ह्यातील काही युवकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच गेस्ट हाऊसच्या मूळ मालकावरही जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, क्रीम व कंडोम असा एकूण 4 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















