Advertisement Advertisement

घरच्या भीतीवरून उडी मारली नंतर आजूबाजूला पाहून घरात घुसला ! तिने विरोध करताच…. एका विरुद्ध गुन्हा….

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज) तालुक्यातील कुरणगाळ खुर्द येथे एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागो लहेनसिंग राठोड (वय ४०, रा. कुरणगाळ खुर्द) याने शनिवारी (दि. २१ जून) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घराच्या अंगणात भिंतीवरून उडी मारून प्रवेश केला. त्यानंतर महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ११५(२) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!