Advertisement Advertisement

कागदपत्र चोरीच्या संशयातून वाद; एका कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): कागदपत्र चोरीच्या संशयावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना खामगाव शहरातील समर्थ नगर परिसरातील गजानन कॉलनी येथे घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी एका कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा विजय गवई (वय ३३, रा. जरीफटका, नागपूर) या आपल्या पती व आईसह ३ जून रोजी रात्री आरोपींच्या घरी गेल्या होत्या. यावेळी कागदपत्र चोरीच्या संशयावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांना, त्यांच्या पतीला व आईला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या आईचे केस ओढून त्यांना घराबाहेर हाकलून देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मारहाणीदरम्यान फिर्यादी व त्यांच्या पतीला लाकडी काठीने हात व पाठीवर मारहाण करून जखमी करण्यात आले. तर फिर्यादीच्या आईला चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून, तिच्या पाठीवर विटेने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आकाश देवीदास गवई, मंगेश देवीदास गवई, देवीदास गवई, सुलभा देवीदास गवई, मनीषा आकाश गवई आणि संतोषी मंगेश गवई (सर्व रा. समर्थ नगर, गजानन कॉलनी, खामगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!