Advertisement Advertisement

BREAKING: रेतीच्या टिप्परची मोटारसायकलला जोरदार धडक; मोटारसायकल वरील युवक जागीच ठार….

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंजनी खुर्द मार्गावरील भानापूरजवळ रेती भरलेल्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मृत युवकाचे नाव गजानन हरिभाऊ मुळे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मुळे हे त्यांच्या दुचाकीने (एमएच २८ सीए ६८३०) अंजनी खुर्द मार्गाने जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने (एमएच २८ बीबी ८३०२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गजानन मुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

यावेळी डीवायएसपी संतोष खाडे, आलेवार साहेब, लक्ष्मण कटक, नागरे साहेब आणि केदार साहेब यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सुलतानपूर येथील प्रतिष्ठित नागरिक शेख खाजा शेख उमर आणि शेख खाजा शेख अख्तर यांनीही पोलिसांना सहकार्य केले.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!