Advertisement Advertisement

जेवण संपल्यावर पैसे जमा करा म्हणताच एकाने रिकामी बियर ची बाटली डोक्यात फोडली….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): भागीदारीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका व्यावसायिकावर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील शिवनेरी हॉटेलमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शब्बीर शेख गुलाम हैदर (वय ४६, रा. काळीपुरा, मलकापूर) हे रेल्वे पुलाजवळ वेल्डिंगचे दुकान चालवतात. गुरुवारी रात्री ते नांदुरा रोडवरील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या शिवनेरी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मयूर अभिमान हुंबे याने शब्बीर यांना सोबत जेवण्यासाठी बोलावले. त्याच्यासोबत विनय व पवन हे दोघेही उपस्थित होते. जेवणादरम्यान भागीदारीच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच मयूर हुंबे व विनय यांनी शब्बीर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

दरम्यान, पवन याने टेबलवरील रिकामी बिअरची बाटली शब्बीर यांच्या डोक्यात फोडल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी मयूर अभिमान हुंबे, पवन आणि विनय यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!