Advertisement Advertisement

चिखलीकरांनो, जरा जपून! पावसातलं पाणी निघालं खराब; ४३ पैकी २ नमुने दूषित! कोणत्या गावातले पाणी दुषित आहे; तर बातमी वाचा…

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढत असतानाच चिखली तालुक्यातील पाणी नमुने तपासणीच्या अहवालातून सतर्कतेची गरज समोर आली आहे. जुलै महिन्यात तालुक्यातून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४३ पाणी नमुन्यांपैकी २ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित नमुने आढळलेल्या गावांमध्ये कोलारा आणि वसंतनगरचा समावेश आहे.

जुलै महिन्यात चिखली तालुक्यातील विविध ठिकाणांहून ४३ पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन नमुने दूषित आढळल्याने संबंधित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

जिल्ह्यात ९४४ नमुन्यांची तपासणी….

बुलढाणा जिल्ह्यात जुलै महिन्यात एकूण ९४४ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३० नमुने दूषित आढळले. यामध्ये शहरी भागातील १६, तर ग्रामीण भागातील १४ नमुन्यांचा समावेश आहे.

बुलढाणा शहरातील ९० नमुन्यांपैकी एकही नमुना दूषित आढळला नाही. चिखलीत ४३ पैकी २, खामगावात ५८ पैकी २, मेहकरमध्ये १ पैकी १, मोताळ्यात ७० पैकी १, नांदुरात ६८ पैकी २, संग्रामपूरमध्ये ४० पैकी २, शेगावमध्ये ४० पैकी १ आणि सिंदखेडराजामध्ये ३६ पैकी २ नमुने दूषित आढळले. देऊळगाव राजा, जळगाव जामोद, लोणार आणि मलकापूर येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये दूषित नमुना आढळला नाही.

ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत १३ नमुने दूषित….

१ ते १० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात २६५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये चिखली तालुक्यातील कोलारा आणि वसंतनगर येथील पाणी नमुन्यांचाही समावेश आहे.

पावसाळ्यात काळजी घेण्याची गरज….

पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी शक्यतो उकळून किंवा योग्य पद्धतीने निर्जंतुक करून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच दूषित नमुने आढळलेल्या गावांमध्ये संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जुलै महिन्यातील पाणी नमुना तपासणी…

तालुकातपासलेले नमुनेदूषित नमुनेदूषिततेचे प्रमाण
चिखली४३२४.७%
खामगाव५८२३.४%
मेहकर१११००%
मोताळा७०११.४%
नांदुरा६८२२.९%
संग्रामपूर४०२५%
शेगाव४०१२.५%
सिंदखेडराजा३६२५.६%
बुलढाणा शहर९०००%

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!