देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरून १० लाख रुपये आणावेत, अन्यथा दुसरे लग्न करू, अशी धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील सध्या रा. देऊळगाव मही यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, चिखली तालुक्यातील एका गावातील ककुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करून पैसे न आणल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी दिल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.













