Advertisement Advertisement

शेगावात पावसाचा कहर! घराची भिंत कोसळून ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू! सततच्या मुसळधार पावसामुळे दुर्घटना…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शेगाव शहरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसादरम्यान शहरातील फुलेनगर येथील एका घराची भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना ३० जुलै रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव सरस्वती गोटीराम पल्हाडे (वय ८५) असे आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे घराची भिंत कमकुवत झाली होती. अचानक भिंत कोसळल्याने सरस्वती पल्हाडे या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या दुर्दैवी घटनेमुळे फुलेनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सततच्या पावसामुळे जुन्या व जीर्ण घरांबाबत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!