चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात पेपर देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत आहे. २४ जून रोजी सकाळी तिचे वडील तिला महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी सोडून आले होते. पेपर संपल्यानंतर तिला घरी घेण्यासाठी वडील महाविद्यालयात गेले असता ती कॉलेज परिसरात आढळून आली नाही.
यानंतर महाविद्यालय परिसरात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेण्यात आला. मात्र, ती कुठेही मिळून न आल्याने अखेर चिखली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन काकडे करीत आहेत.













