Advertisement Advertisement

शेतात जाण्याच्या वादातून चौघांविरुद्ध गुन्हा; शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी….

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतात जाण्यास विरोध करत शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सारंगधर बोंबटकर (रा. पिंपळगाव राजा) यांची शिवारातील गट क्रमांक ८२२ मध्ये शेती आहे. या शेतात जाण्यासाठी गावातून ये-जा करण्याच्या रस्त्यावरून जात असताना आरोपींकडून वारंवार विरोध केला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

१८ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास तक्रारदार शेतात असताना आरोपी तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच, “पुन्हा शेतात आल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून जीवे मारू,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी मधुकर इंगळे, रमेश किसन इंगळे, अशोक इंगळे व उमेश अशोक इंगळे (सर्व रा. सानपुडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 352, 351(2), 351(3) व 3(5) अंतर्गत नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चिखलकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!