Advertisement Advertisement

केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांचे पुतणे युवा नेते योगेश जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याकडे साखरखेड्यासह परिसराचे लक्ष!

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शिवसेना युवा नेते तथा समाजसेवक योगेश पंजाबराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा आज, दि. १२ जून रोजी साखरखेर्डा येथे उत्साहात पार पडणार आहे. श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध मठाच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जाहिरात 👆

श्री योगेश पंजाबराव जाधव फाउंडेशन व मित्र मंडळ, साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कल तसेच शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले युवा नेते योगेश जाधव यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विशेष आदरभाव आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यास केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी योगेश जाधव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येणार असून ते उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारून जनतेशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार व शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महेंद्र पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!