Advertisement Advertisement

पोरगी कॉलेजच्या नावानं बाहेर पडली अन् गायबच झाली! सुलतानपुर परिसरातील घटना…

बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज): पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सदर तरुणी २८ मे रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान सुलतानपूर येथे कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

तरुणीचा मोबाईल तसेच नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी करूनही तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने अखेर कुटुंबीयांनी बीबी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी बीबी पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तरुणीचा शोध सुरू केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. तरुणीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास बीबी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!