लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): प्रेमसंबंधाच्या आडून विश्वास संपादन करत एका २२ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी एक सरकारी कर्मचारी याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून, २०२३ मध्ये पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होती. त्यावेळी तिची आरोपी त्याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत वारंवार तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित तरुणी विवेकानंदनगर परिसरात राहत असताना आरोपी सुदर्शननगर आणि टीव्ही सेंटर परिसरात राहत होता. आरोपी तिला विविध ठिकाणी, रूम, लॉज तसेच तिच्या राहत्या खोलीवर नेऊन अत्याचार करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधांच्या काळात आरोपीने तरुणीचे काही खासगी फोटोही काढले होते. नंतर आरोपीची एसआरपीमध्ये नागपूर येथे नियुक्ती झाल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. तसेच खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे…












