Advertisement Advertisement

पाहुण्याच्या घरी शिदोरीच्या कार्यक्रमातून १६ वर्षांची पोरगी गायब; फूस लावून पळवली का? गावात खळबळ….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका खेडेगावात शिदोरीच्या कौटुंबिक कार्यक्रमात मोठी धक्कादायक घटना घडली. कार्यक्रमाला आलेली १६ वर्षे ८ महिन्यांची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दलपत जाधव हे पत्नीसमवेत बुधवार ११ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजता शिदोरीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्वांनी जेवण केल्यानंतर दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घरी निघताना त्यांची मुलगी दिसत नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यामुळे कुटुंबीयांची धावपळ उडाली.

यानंतर कार्यक्रमस्थळ, गाव परिसर तसेच नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध करण्यात आली; मात्र मुलगी कुठेही आढळून आली नाही. बेपत्ता मुलीच्या अंगात गुलाबी रंगाचा टॉप, पिवळसर रंगाची पॅन्ट, पांढरी ओढणी, पायात काळ्या रंगाची चप्पल असून रंग सावळा, उंची सुमारे पाच फूट, बांधा सडपातळ व गळ्यात चांदीची चैन असल्याची माहिती देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून बुलढाणा ग्रामीण पोलीस पुढील तपास करत मुलीचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!