Advertisement Advertisement

“गाडीचं भाडं मागितलं तर तरुणाला चोपला; गणेशपूरात चौघांवर गुन्हा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथे टाटा मॅजिक गाडीचे थकीत भाडे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिवीगाळ करून चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील इंद्रजीत बाळकृष्ण वाघे  यांच्याकडे एमएच-२८-आर-३३५७ क्रमांकाची टाटा मॅजिक गाडी असून ती ते भाड्याने चालवतात. फेब्रुवारी २०२६ मध्ये आरोपी शेषराव उर्फ विक्की गजानन झाटे यांच्या नातेवाईकांनी ही गाडी सिल्लोड  येथे लग्नासाठी ३ हजार रुपयांत भाड्याने नेली होती. मात्र लग्नाचे काम आटोपल्यानंतरही गाडीचे भाडे देण्यात आले नव्हते. त्यामुळे ९ मार्च रोजी सायंकाळी इंद्रजीत वाघे यांनी शेषराव झाटे याच्याकडे पैसे मागितले.

यावरून वाद निर्माण होऊन आरोपी शेषराव झाटे, किशोर लठाड, नागेश ढोके आणि दीपक डिगांबर लठाड यांनी इंद्रजीत वाघे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. या प्रकरणी इंद्रजीत वाघे यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार प्रवीण जाधव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!