Advertisement Advertisement

चिखली-बुलढाणा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):
चिखली-बुलढाणा रोडवर शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मोसंबेवाडी ता. जानेफळ येथील रहिवासी दत्तात्रय वाघ (वय ३४) हे आपल्या दुचाकीने जात असताना हातनी-चिखली-बुलढाणा रोडवर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला.
या अपघातात दत्तात्रय वाघ यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील सुमीत तेलरकर (रा. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. सुमीत तेलरकर हे वरुड नाका येथील एका बँकेच्या शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!