Advertisement Advertisement

मकाच्या शेतात नेवून अत्याचार केला; शेतात नेवून मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला….! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): एका गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला हाय. एका २५ वर्षांच्या विवाहित बाईला अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देत आरोपीने वारंवार जबरदस्ती केल्याचा प्रकार उघड झाला हाय. या प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशन येथे आरोपीवर बलात्कार व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाय.

पीडित बाईनं दिलेल्या तक्रारीनुसार, ती मजुरीसाठी शेतात एकटी जात असताना आरोपीने तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. त्यावेळी फोटो कशाला काढले असं विचारलं असता आरोपी तिथून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी परत शेतात जाऊन तिचा हात धरून व्हिडीओ काढला आणि “कोणाला सांगितलंस तर तुला, तुझ्या नवऱ्याला आणि लेकरांना जीवे मारीन” अशी धमकी दिली.

त्या धमकीच्या जोरावर आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद केलं हाय. सन २०२४ मध्ये पीडित महिला माहेरी असताना सुद्धा आरोपीने फोटो आईला दाखवण्याची धमकी देत जबरदस्ती केली. तसेच ९ फेब्रुवारी रोजी सकाळी गावाजवळील मकाच्या शेतात नेऊन पुन्हा अत्याचार करून जीव मारण्याची धमकी दिली.

या गंभीर प्रकारानंतर पीडित महिलेनं धाडस करून पोलीस ठाणं गाठलं. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध अनुसूचित कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाय.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!