Advertisement Advertisement

शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकी चोरी; तिघांना अटक….

संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकऱ्याच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी केल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे.

तालुक्यातील वकाना येथील शेतकरी बद्रीनारायण ठोंबरे यांच्या घरासमोर एमएच-२८-बीटी-३५०९ क्रमांकाची होंडा युनिकॉर्न दुचाकी उभी होती. १८ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी न सापडल्याने ठोंबरे यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार विष्णू कोल्हे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान जळगाव जामोद येथील ईरशाद खान रहेमत खान व शेख साजीद शेख हबीब यांच्याकडे चोरीची दुचाकी आढळून आली. कसून चौकशीत त्यांनी ही दुचाकी शेख जाकीर शेख जहाँबाज (रा. हिवरखेड) याने गहाण स्वरूपात ठेवल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी शेख जाकीर याला पकडण्यासाठी सोनाळा बसस्थानक परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी शेख साजीद शेख हबीब, ईरशाद खान रहेमत खान व शेख जाकीर शेख जहाँबाज यांना संग्रामपूर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!