Advertisement Advertisement

चालकाला डुलकी लागल्याने भरधाव ट्रक पलटी; समृद्धी महामार्गावर थरार….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने भरधाव ट्रक पलटी होऊन महामार्गाखाली कोसळल्याची घटना ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.

डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या समृद्धी महामार्गावरील पॅनल क्रमांक २६८, नागपूर कॉरिडॉरवर मुंबईहून नागपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक WB 23 E 6417 चालकाच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट महामार्गाखाली जाऊन उलटला.

या अपघातात ट्रक चालक सुनील कुमार मोरया हा किरकोळ जखमी झाला असून ट्रकमध्ये बारधाना भरलेला होता. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालक व वाहक यांना बाहेर काढून अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी मेहकर येथे रवाना केले.

दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकमधील मालाची चोरी होऊ नये यासाठी डोणगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत सुरक्षा पुरवली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!