Advertisement Advertisement

सकाळी घरातून बाहेर पडली, पण परतलीच नाही! दाताळ्यातील तरुणी बेपत्ता; गावातील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दाताळा गावातून १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणीला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी गावातीलच एका युवकाविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाताळा येथील विजय हरीभाऊ पाटील (वय ४७) यांची मुलगी श्रावणी विजय पाटील (वय १८ वर्षे ३ महिने) ही १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गावातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.

कोणीतरी अज्ञात कारणावरून श्रावणीला फुस लावून अज्ञात ठिकाणी पळवून नेले असावे, असा संशय विजय पाटील यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, संशयित युवक आणि तरुणीचे कुटुंबीय एकाच गावातील रहिवासी आहेत. याप्रकरणी त्यांनी गावातीलच रोशन छगन इंगळे याच्यावर संशय व्यक्त केला आहे.

विजय पाटील यांच्या तोंडी फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी रोशन इंगळे याच्याविरुद्ध कलम १४० (३) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुभाष सरकाटे करीत असून, बेपत्ता तरुणीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!