Advertisement Advertisement

अवघं ३० वय अन् आयुष्याचा प्रवास थांबला! समाधानच्या मृत्यूने धामणगावात हळहळ!

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): धामणगाव येथे एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडकीस आली. समाधान तुकाराम गुजर (वय ३०, रा. धामणगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सुरेश गुजर (वय ३६, रा. धामणगाव, ह.मु. शेलूद, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी धाड पोलीस ठाण्यात हजर होऊन माहिती दिली. समाधान हा त्यांचे सख्खे मोठे काका तुकाराम केशव गुजर यांचा मुलगा होता.

गुरुवारी सकाळी धामणगाव येथील प्रदीप रामदास मोरे यांनी नारायण गुजर यांना फोन करून समाधानचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली आहे. ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!