Advertisement Advertisement

घरगुती सामान आणण्यासाठी गेलेली २२ वर्षीय युवती बेपत्ता! किणगाव राजा पोलिसांत मिसिंग दाखल…

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर युवती २४ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर पडली होती. “गावातून काही घरगुती सामान व आवश्यक वस्तू घेऊन येते,” असे सांगून ती घराबाहेर गेली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

युवतीचा मोबाईल संपर्कही होत नसल्याने नातेवाईकांनी गावासह परिसरातील शेतशिवार, रस्ते व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. ग्रामस्थांनीही शोधमोहीम राबवली, मात्र उशिरापर्यंत तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबीयांनी तात्काळ किणगाव राजा पोलीस ठाणे गाठून तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग दाखल करून युवतीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, युवतीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ किणगाव राजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!