Advertisement Advertisement

BREAKING:खामगावात डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाचा खून; शहरात खळबळ…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शहरातील बर्डे प्लॉट परिसरात लग्न समारंभादरम्यान डीजेवर नाचताना झालेल्या किरकोळ धक्क्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन एका 23 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिलच्या रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत युवकाचे नाव शोएब खान अमीन खान असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बर्डे प्लॉट भागातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभात डीजे सुरू होता. त्यावेळी अनेक युवक नाचत होते. शोएब खान देखील नाचत असताना त्याचा एका युवकाला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

वाद वाढत गेल्यानंतर चार ते पाच जणांनी संगनमत करून शोएब खानवर धारदार शस्त्र तसेच लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!