Advertisement Advertisement

‘तुझ्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला’ म्हणत रस्त्यात अडवून वार; पिंपळगाव नाथच्या तरुणाची प्रकृती गंभीर….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तरवाडी-कंडारी रस्त्यावर घडली. या हल्ल्यात पिंपळगाव नाथ येथील आकाश गजानन वाघ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपी गजानन गोपाल भोजने (रा. उमरा, ता. खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी गजानन रामकृष्ण वाघ यांच्या माहितीनुसार, आकाश वाघ हा खामगाव येथील न्यायालयात तारखेसाठी गेला होता. न्यायालयातून परत येत असताना तरवाडी ते कंडारी रस्त्यावर आरोपीने त्याला अडवले. “तुझ्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला,” असे म्हणत जुन्या वादातून चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!