Advertisement Advertisement

तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत, “चल आपण एन्जॉय करू” म्हणत महिलेचा विनयभंग; शेगावात आरोपी जेरबंद…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “चल आपण एन्जॉय करू” असा अश्लील प्रस्ताव देत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी आहे. ती १ एप्रिल रोजी पतीसह शेगाव येथे उपचारासाठी आली होती. उपचारानंतर दोघेही घरी परतत असताना महिला मित्राच्या मोटारसायकलवरून पुढे गेली. मात्र मोटारसायकलची चावी पतीकडे राहिल्याने ती गावाजवळील फाट्यावर उतरली.

याच वेळी आरोपी रतन सुरेश दाभाडे (रा. पाडसूळ, ता. शेगाव) हा मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने पीडितेस अश्लील प्रस्ताव देत “तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत, शेगावला चल आपण एन्जॉय करू,” असे म्हणत तिचा हात पकडून गैरवर्तन केले.

घटनेदरम्यान पीडितेचे पती व साक्षीदार घटनास्थळी पोहोचले असता, पीडितेने संपूर्ण प्रकार सांगितला. यावर आरोपीने पती व साक्षीदारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ११७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ३५२, ३५१(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!