Advertisement Advertisement

पूर्णा नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निमगाव परिसरात शोककळा….

निमगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) : पूर्णा नदी पात्रातील पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, २१ मे रोजी पातोंडा शिवारात घडली. या घटनेमुळे अलमपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव तुषार रामदास तायडे (वय २३, रा. अलमपूर ता. नांदुरा) असे आहे. तो नांदुरा येथील कोठारी कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता. याप्रकरणी त्याचा चुलतभाऊ ऋषीकेश संतोष तायडे (वय २९) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा शिवारातील उमेश कुवारे यांच्या शेतातील गोठ्यावर तुषारच्या गायी राहत होत्या. गावातील उमेश कुवारे हे त्यांच्या बकऱ्यांसोबत तुषारच्या गायीही चारत असत. दररोजप्रमाणे गुरुवारी तुषार हा गायींना पाणी पाजण्यासाठी पूर्णा नदीकाठी गेला होता. यावेळी त्याची एक गाय नदी पात्राकडे गेल्याने तिला हाकलण्यासाठी तो नदीच्या काठावर गेला. मात्र पाय घसरल्याने तो थेट पाण्यात पडून बुडाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुराचे उपसभापती पुरुषोत्तम झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मोरे, किशोर नेमाडे, लहू नेमाडे, कैलास झाल्टे, ओमसाई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, आदित्य इंगळे यांच्यासह अनेकांनी मदतकार्य केले.

तुषार याचे शव बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अलमपूर येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुषार हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील व बहीण असा परिवार आहे.

या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. सोळंके हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!