Advertisement Advertisement

शेतजमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग; मारहाण करत जीवे मारण्याची धमकी, ५ जणांविरुद्ध गुन्हा

चिखला काकड(बुलडाणा कव्हरेज न्युज): बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील देवनगर शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. सुमन विजय पवार (वय ४५) या आपल्या भावाच्या मालकीच्या गट क्रमांक ३६ मधील शेती देवनगर शिवारात कसत आहेत. ५ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास त्या शेतात दगड उचलण्याचे काम करत होत्या. त्याचवेळी जेसीबीच्या सहाय्याने शेत समतल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, आरोपी अमोल प्रभाकर पालकर याने जेसीबीचे काम बंद पाडले. त्यानंतर बंडू राऊत, बाबू राऊत, अमोल राऊत, अतुल राऊत व अक्षय राऊत हे देखील घटनास्थळी आले. आरोपींनी संबंधित शेत आमचे असल्याचा दावा करत फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली. यावेळी अमोल पालकर याने महिलेचा हात धरून विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच बंडू राऊत याने त्यांच्या हाताला चावा घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

महिलेच्या आरडाओरडीनंतर त्यांचे भाऊ गोविंद व विठ्ठल राठोड हे घटनास्थळी धावून आले. त्यावेळी आरोपींनी गोविंद राठोड यांना काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी बीबी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ७६, ११८(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(३) आणि ३५२ नुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!