Advertisement Advertisement

मलकापुरात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरफोडीचा थरार! बंद घर फोडून ४.२४ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मलकापूर शहरातील नंदनवन नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत तब्बल ४ लाख २४ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे घर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष प्रल्हाद पहुरकर यांचे असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष पहुरकर (वय ६०, रा. अग्रवाल टेन्ट हाऊसजवळ, नंदनवन नगर, मलकापूर) हे ११ जुलै रोजी दुपारी १२ ते रात्री ८ वाजेदरम्यान नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेले होते. घरी परतल्यानंतर मुख्य दरवाज्याचे कुलूप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळून आले.

चोरट्यांनी दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याची सौभाग्यवती पोथ, चैनसदृश पोथ, लहान पोथ, सोन्याची अंगठी, दोन जोड चांदीच्या चैनपट्ट्या तसेच ४० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी सुभाष पहुरकर यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!