Advertisement Advertisement

“रात्र गेली, पहाट झाली… पण पोरीचं काहीच निशाण नाय; बोराखेडी पोलिसांचा शोध सुरू…!”

मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): नांदुरा तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवती घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी युवतीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता युवतीच्या २१ वर्षीय भावाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २१ जून रोजी रात्री कुटुंबीय जेवण करून घराच्या गच्चीवर झोपले होते. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने सर्वजण घरात येऊन झोपले. मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास युवती घरातच झोपलेली होती.

मात्र २२ जून रोजी पहाटे सुमारे पाच वाजता आईने युवती पलंगावर नसल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी घर परिसर, नातेवाईक तसेच इतर संभाव्य ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बेपत्ता युवतीचा रंग सावळा, उंची सुमारे पाच फूट असून, तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!