चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील तेल्हारा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निष्क्रिय कारभारामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावच्या पाणीपुरवठा विहरीला मुबलक पाणी उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.याबाबत वारंवार मागणी होऊनही कार्यवाही झाले नसल्याचा सुर गाव बैठकीत उमटल्याचे बगावयास मिळाले
पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांची बैठक बोलावली. या बैठकीत गावासाठी स्वखर्चातून मोफत पाणीसेवा देण्याचा निर्णय विद्यानंद कुटे,सचिन कुटे या दोघां बंधुने घेतल्याने या निर्णयामुळे गावकऱ्यांनी त्यांचे कौतूक केले.
विशेष म्हणजे, तेल्हारा तलावालगत पाणीपुरवठा विहरीवरुण चार ते पाच गावांना पाणीपुरवठा होत असतानाही तेल्हारा गावालाच पाणी असतांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये, महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने विद्यानंद कुटे यांच्यासह युवक व नागरीकानी जबाबदारी उचलत पाण्याचा टँकर सुरू केला आहे. दररोज टँकरद्वारे पाणी वाटप करण्यात येत असून, त्यामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना युवकांना पुढे यावे लागणे ही चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.












