साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):पोलीस स्टेशन हद्दीतील बाळसमुद्र येथील १९ वर्षीय रेणुका गजानन साबळे ही तरुणी दुपारी “संडासला जाते” असे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र ती परतलीच नसल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका घरातून निघताना शाळेची मूळ कागदपत्रे, आधारकार्ड तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे पासबुक सोबत घेऊन गेली होती. त्यामुळे हा प्रकार अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, रेणुकाचा ज्ञानेश्वर डोंगरदिवे (रा. थार) याच्यासोबत संपर्क असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात त्याची भूमिका तपासली जात आहे. पोलिसांकडून सर्व शक्य त्या दिशेने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणीचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.












