Advertisement Advertisement

बुलढाण्यातच NEET-JEE ची दमदार तयारी; विद्यार्थ्यांसाठी PAHEL Institute ठरतंय यशाची ‘पहिली पायरी’

बुलढाणा (वाणिज्य: बुलडाणा कव्हरेज न्युज) : उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याऐवजी आपल्या मुलांना स्थानिक पातळीवरच सुरक्षित, दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळावे, याकडे आता पालकांचा वाढता कल दिसून येत आहे. अशा परिस्थितीत NEET, JEE आणि MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी बुलढाण्यातील PAHEL Institute विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत आहे.

गेल्या सहा वर्षांपासून PAHEL Institute ‘Concept + Practice + Proper Guidance’ या तत्त्वावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. संस्थेच्या सक्षम अध्यापनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी AIIMS, GMC यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवत यश संपादन केले आहे. आतापर्यंत २० हून अधिक मेडिकल प्रवेश, ४० पेक्षा अधिक BDS व BAMS प्रवेशांसह १००० हून अधिक विद्यार्थ्यांचा विश्वास संस्थेने जिंकला आहे.

संस्थेची विशेष वैशिष्ट्ये म्हणजे IITian Faculty (Avanti Learning, मुंबई) यांचे मार्गदर्शन, डिजिटल स्मार्ट क्लासेस, दररोज MCQ सराव, ऑनलाईन टेस्ट सिरीज, सविस्तर प्रगती विश्लेषण, नियमित शंका निरसन सत्रे तसेच पालकांशी सातत्यपूर्ण संवाद. यामुळे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी अधिक मजबूत आणि परिणामकारक होत आहे.

संस्थेचे संचालक प्रा. निखिल श्रीवास्तव म्हणाले, “योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक वातावरण मिळाल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहत नाही. PAHEL Institute मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर देतो.”

NEET, JEE आणि MHT-CET सोबतच इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीसाठी फाउंडेशन बॅचेसही येथे उपलब्ध आहेत. नवीन बॅचेस १५ एप्रिलपासून सुरू झाल्या असून प्रवेश मर्यादित असल्याने पालकांनी लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

शहरातच उत्कृष्ट मार्गदर्शन, सुरक्षित वातावरण आणि यशस्वी निकालांची परंपरा या तिन्ही गोष्टींचा संगम असलेले PAHEL Institute विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थाने ‘पहिली पायरी’ ठरत आहे.

पत्ता : चैत्यन्य वाडी, बुलढाणा
संपर्क : 9763009156 / 9766924900

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!