Advertisement Advertisement

शेतातून परतणाऱ्या विवाहितेवर रस्त्यात छेडछाड; कपडे फाडून दागिने लंपास…! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात विवाहित महिलेवर छेडछाडीची गंभीर घटना घडली आहे. शेतातून घरी परतत असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून छेडछाड केली व खाली पाडले.

यावेळी आरोपीसोबत असलेल्या इतर तिघांनीही महिलेला मारहाण करत तिचे कपडे फाडले. तसेच गळ्यातील सोन्याची पोथ तोडून घेतली. यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी शिवाजी विठोबा चेके, ज्ञानेश्वर शिवाजी चेके, भास्कर विठोबा चेके व भागवत भास्कर चेके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!