Advertisement Advertisement

वसंत नगरात घरात घुसले अन् दगडांनी डोकं फोडलं! शिवीगाळ करत मारहाण; तिघांवर अंढेरा पोलिसांचा गुन्हा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील वसंत नगर येथे घरात येऊन शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी अशोक रेखु चव्हाण (वय ५२, रा. वसंत नगर, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अशोक चव्हाण हे त्यांच्या घरी उपस्थित होते. त्यावेळी आरोपी अतिश मधुकर चव्हाण, गजानन मधुकर चव्हाण व रेणुका गजानन चव्हाण (सर्व रा. वसंत नगर) हे त्यांच्या घरी आले.

यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर अशोक चव्हाण यांनी ११ सप्टेंबर रोजी दुपारी १.४० वाजता अंढेरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी कायमी गुन्हा क्र. ०२८९/२०२६ अन्वये कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ११५(२), ३(५) बीएनएस प्रमाणे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!