Advertisement Advertisement

‘भावाच्या घरी जाऊन येते’ म्हणाली… अन् अंगणवाडी ताईच गायब! बुलढाण्यात खळबळ…”

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरालगतच्या सुंदरखेड भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणारी महिला शनिवारी सायंकाळी साधारण ६.३० वाजताच्या सुमारास “भावाच्या घरी जाऊन येते” असे सांगून घराबाहेर पडली; पण त्यानंतर ती परतलीच नाही. त्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

महिलेचा बराच वेळपर्यंत पत्ता न लागल्याने तिच्या पतीने नातेवाईकांकडे शोधाशोध केली; मात्र कुठेही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर २० एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, संबंधित महिलेवर गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजारावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या त्याच अवस्थेत घराबाहेर पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी शहर पोलीसांनी तपास सुरू केला असून, महिलेचा शोध घेण्यासाठी विविध पथकं कामाला लागली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!