Advertisement Advertisement

“जुन्या खटकेचा राग! साखळी बुद्रुकमध्ये तरुणाच्या मांडीत चाकू खुपसला; आरोपीवर गुन्हा! दुचाकीला लाथ मारून खाली पाडले; अंड्यांचेही नुकसान, जीवे मारण्याची धमकी….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे जुन्या वादाच्या कारणावरून २८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (दि. १५) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, साखळी बुद्रुक येथील पंकज रवींद्र लंवगे (वय ३१) यांचा भाऊ अंकुश रवींद्र लंवगे (वय २८) हा दुचाकीवर अंडी घेऊन जात होता. त्यावेळी गावातील प्रथमेश जांलीदर हिवाळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून अर्बन परिसरातील रस्त्यावर अंकुश याला अडविले.

यावेळी आरोपीने प्रथम दुचाकीला लाथ मारून अंकुशला खाली पाडले. त्यानंतर जाब विचारताच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि जवळील चाकूने अंकुशच्या मांडीवर वार केला. या हल्ल्यात अंकुश गंभीर जखमी झाला.

घटना पाहून पंकज लंवगे हे भांडण सोडविण्यासाठी धावले असता झालेल्या झटापटीत त्यांच्या डाव्या हातालाही दुखापत झाली. जखमी अंकुश लंवगे याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आरोपीने दुचाकीला लाथ मारल्यामुळे वाहतूक केली जात असलेल्या अंड्यांचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला असून, बुलढाणा ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!