मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली ते देऊळगाव राजा रोडवर मेरा चौकीजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ आज भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. MH 44 T 2002 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी अपघातग्रस्त झाली असून अपघात इतका जबरदस्त होता की परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघात झालेल्या गाडीत नेमके किती जण होते आणि त्यांची ओळख काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र घटनास्थळी पडलेले हार, फटाके आणि इतर लग्नसमारंभातील साहित्य पाहता ही गाडी नवरदेवाची होती.
मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले…













