Advertisement Advertisement

शेतातून घरी आली अन् काही वेळातच गायब झाली! बोराखेडीत २० वर्षांची तरुणी बेपत्ता…

बोराखेडी (बुलडाणा कव्हरेज न्युज): बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ६ सप्टेंबर रोजी शेतातून घरी आली होती. घरी आल्यानंतर काही वेळाने ती अचानक घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे याबाबत बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

बेपत्ता तरुणीची उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, रंग गोरा, चेहरा लांब, केस मोठे असून, बेपत्ता होताना तिच्या अंगात हिरवट रंगाचा टी-शर्ट, हिरव्या रंगाची लोअर आणि हिरव्या रंगाच्या सँडल होत्या, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून पेट्रोलिंग, वाहन तपासणी तसेच अवैध कृत्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!