दर्शन झाल्यानंतर  एका लॉजवर तुझ्या सोबत बोलायचे आहे असे सांगून नेले..! तिच्या सोबत नको ते केले…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : येथील मंदिर परिसरातील एका लॉजवर २ फेब्रुवारी रोजी १९ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित युवतीने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता आरोपी आकाश सोनाजी भामद्रे (रा. सोनाळा) याने दर्शन झाल्यानंतर “तुझ्याशी बोलायचे आहे” असे सांगून मंदिर परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे युवतीची इच्छा नसताना आरोपीने वाईट उद्देशाने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला.

त्यानंतर या घटनेची वाच्यता कोणास केली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडितेच्या तोंडी फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ६४, ७४, ३५१ (२) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम ३ (१) (w) (i), ३ (१) (w) (ii), ३ (२) (v) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!