Advertisement Advertisement

“हडहड वरून भांडण पेटलं; बॅटने तुफान मार”! मलकापूर येथील घटना…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) “हडहड” असे म्हटल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका कुटुंबावर बॅटने हल्ला करून मारहाण केल्याची घटना मलकापूर शहरात घडली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष नामदेव गाडे (रा. कुलमखेड, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी दिलीप हिंगे (वय ५०) व उदय हिंगे (वय ३०, दोन्ही रा. कुलमखेड) हे त्यांच्या घरासमोरून जात असताना “हडहड” असे म्हणाले. त्यावर “हडहड कोणाला म्हटले?” असा जाब विचारला असता आरोपींनी संतापून फिर्यादीच्या मुलांना बॅटने मारहाण करून जखमी केले.

यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीच्या गालावर चापट मारून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक २५०/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२(२), ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहम्मद रिजवान करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!